Skip to content
Pune, Thursday, 12 November 2026 26°C AQI 55
City News

HCMTR आणि इनर रिंग रोडच्या भूसंपादनाला गती, जागांची मोजणी 20 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना

पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम आणि जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी HCMTR आणि इनर रिंग रोडच्या भूसंपादनाचा आढावा घेतला. खासगी जागांची मोजणी आणि संयुक्त मोजणी शुक्रवार, 20 नोव्हेंबर 2026 पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.

By Sham Rathi ·

PMC Commissioner and officials at the HCMTR and Inner Ring Road land acquisition review meeting, Pune Actual image
HCMTR आणि इनर रिंग रोडच्या भूसंपादनाची आढावा बैठक

पुणे शहरातील दोन महत्त्वाच्या रस्ते प्रकल्पांच्या भूसंपादनाला आता वेग येणार आहे. HCMTR (High Capacity Mass Transit Route) आणि इनर रिंग रोड या प्रकल्पांच्या भूसंपादन प्रक्रियेचा आढावा पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम आणि जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी घेतला.

खासगी जागांची मोजणी आणि संयुक्त मोजणीचे काम पुढील शुक्रवार, 20 नोव्हेंबर 2026 पर्यंत पूर्ण करावे, अशा सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

Read also: Metro Line 3 Saves Hinjawadi IT Employees 1 to 1.3 Hours a Day

HCMTR: खासगी जागांची मोजणी प्राधान्याने

HCMTR प्रकल्पासाठी लागणाऱ्या खासगी जागांच्या भूसंपादनाची सद्यस्थिती बैठकीत जाणून घेण्यात आली. संबंधित जागांची मोजणी प्राधान्याने आणि लवकरात लवकर पूर्ण करावी, तसेच भूसंपादनात येणाऱ्या अडचणी तपासून त्या तातडीने सोडवाव्यात, असे निर्देश देण्यात आले.

इनर रिंग रोड: संयुक्त मोजणी तातडीने

इनर रिंग रोडच्या संयुक्त मोजणीची सद्यस्थिती आणि भूसंपादन प्रक्रियेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. संयुक्त मोजणीचे प्रलंबित काम तातडीने पूर्ण करून भूसंपादनाची पुढील प्रक्रिया जलद राबवावी, असे सांगण्यात आले.

बैठकीला उपस्थित अधिकारी

अतिरिक्त महापालिका आयुक्त (जनरल) पवनीत कौर, अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) ओमप्रकाश दिवटे, शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर, मुख्य अभियंता (पथ) राजेश बनकर, उपायुक्त निखिल मोरे आणि संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

  • आढावा बैठकीत चर्चा करताना अधिकारी Actual image
    आढावा बैठकीत चर्चा करताना अधिकारी
  • बैठकीला उपस्थित संबंधित विभागांचे अधिकारी Actual image
    बैठकीला उपस्थित संबंधित विभागांचे अधिकारी

Questions and answers

HCMTR आणि इनर रिंग रोडच्या भूसंपादनासाठी जागांची मोजणी कधीपर्यंत पूर्ण करायची आहे?

खासगी जागांची मोजणी आणि संयुक्त मोजणी शुक्रवार, 20 नोव्हेंबर 2026 पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत.

HCMTR आणि इनर रिंग रोडच्या भूसंपादनाचा आढावा कोणी घेतला?

पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम आणि पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी.

In English

Pune Municipal Commissioner Naval Kishore Ram and District Collector Jitendra Dudi reviewed land acquisition for two major road projects in Pune: the HCMTR (High Capacity Mass Transit Route) and the Inner Ring Road. They told officials to finish the survey of private land and the pending joint survey by Friday, 20 November 2026, and to solve any problems in land acquisition quickly so the next steps can move faster. Additional Commissioners Pavneet Kaur and Omprakash Diwate, City Engineer Aniruddha Pawaskar, Chief Engineer (Roads) Rajesh Bankar and Deputy Commissioner Nikhil More attended the meeting.

What is the deadline for the HCMTR and Inner Ring Road land survey in Pune?

The survey of private land and the joint survey are to be finished by Friday, 20 November 2026.

Who reviewed land acquisition for Pune's HCMTR and Inner Ring Road?

PMC Commissioner Naval Kishore Ram and Pune District Collector Jitendra Dudi.

Follow PuneDiary on Facebook Daily Pune news, events and updates in your feed. Join 13,000+ Punekars.
Filed under: City News

Share this story

More Pune news

Something wrong or missing on this page? Suggest a correction
Our team checks every suggestion before the page is changed.