Skip to content
Pune, Monday, 9 November 2026 26°C AQI 56
Social

भवानी पेठेतील श्री बालाजी मंदिरात धनत्रयोदशीला 1 किलो 700 ग्रॅम चांदीचा मुकुट अर्पण

धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर, शुक्रवार 6 नोव्हेंबरला, भवानी पेठेतील आसनस्थ श्री बालाजी मंदिरात उद्योगपती विशाल राजेश मेहता आणि मेहता परिवाराने भगवान श्री बालाजींना 1 किलो 700 ग्रॅमचा चांदीचा मुकुट अर्पण केला.

By Sham Rathi ·

Lord Balaji wearing the new silver crown at Shri Balaji Mandir, Bhavani Peth, Pune Actual image
चांदीच्या नव्या मुकुटातील भगवान श्री बालाजी, भवानी पेठ

धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर, शुक्रवार 6 नोव्हेंबर 2026 रोजी, भवानी पेठ (377) येथील आसनस्थ श्री बालाजी मंदिरात भगवान श्री बालाजी महाराजांना 1 किलो 700 ग्रॅम वजनाचा चांदीचा मुकुट अर्पण करण्यात आला. उद्योगपती विशाल राजेश मेहता आणि मेहता परिवाराने श्रद्धेने हे अर्पण केले.

पंचामृत पूजा आणि अर्पण

श्री श्री 1008 महंत रामनारायण दास बैरागी महाराज यांच्या या मंदिरात श्री श्री 108 लालदासजी बैरागी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली मेहता परिवाराने विधिवत पूजन केले. चांदीच्या मुकुटाची पंचामृत पूजा करून तो भगवान श्री बालाजींना समर्पित करण्यात आला. त्यानंतर भाविकांना प्रसादाचे वाटप झाले.

या वेळी उद्योजक रामभाऊ जगदाळे आणि अनेक भाविक उपस्थित होते. मंदिरात भक्तिमय वातावरण होते.

  • लालदासजी बैरागी महाराज आणि मेहता परिवाराकडून चांदीच्या मुकुटाचे अर्पण Actual image
    लालदासजी बैरागी महाराज आणि मेहता परिवाराकडून चांदीच्या मुकुटाचे अर्पण

Questions and answers

भवानी पेठ पुणे येथील श्री बालाजी मंदिरात धनत्रयोदशी 2026 ला कोणता मुकुट अर्पण झाला?

1 किलो 700 ग्रॅम वजनाचा चांदीचा मुकुट, शुक्रवार 6 नोव्हेंबर 2026 रोजी, उद्योगपती विशाल राजेश मेहता आणि मेहता परिवाराकडून.

भवानी पेठेतील आसनस्थ श्री बालाजी मंदिर कुठे आहे?

377, भवानी पेठ, पुणे येथे.

In English

On Dhantrayodashi, Friday 6 November 2026, industrialist Vishal Rajesh Mehta and the Mehta family offered a silver crown weighing 1 kg 700 g to Lord Balaji at the Asanastha Shri Balaji Mandir, 377 Bhavani Peth, Pune. The family performed a panchamrut puja under the guidance of Shri Shri 108 Laldasji Bairagi Maharaj before the crown was offered, and prasad was then given to devotees. Businessman Rambhau Jagdale and many devotees were present.

What was offered at the Bhavani Peth Balaji Mandir in Pune on Dhantrayodashi 2026?

A silver crown weighing 1 kg 700 g, offered by industrialist Vishal Rajesh Mehta and the Mehta family on 6 November 2026.

Follow PuneDiary on Facebook Daily Pune news, events and updates in your feed. Join 13,000+ Punekars.
Filed under: Social

Share this story

More Pune news

Something wrong or missing on this page? Suggest a correction
Our team checks every suggestion before the page is changed.