Skip to content
Pune, Friday, 6 November 2026 26°C AQI 60
Social

भेकराईनगर योग सामाजिक संस्थेची दिवाळी पहाट रंगली, भक्तिगीते, अभंग आणि जुन्या गाण्यांची सुरेल मैफल

वसुबारसेच्या दिवशी भेकराईनगर योग सामाजिक संस्थेच्या योग केंद्रात सकाळी 6 ते 9 दिवाळी पहाट कार्यक्रम झाला. सांगलीच्या गायिका अर्चना कदम, उमेश माळी आणि शाहूराज माने यांच्या गाण्यांना रसिकांची मोठी दाद मिळाली.

By Sham Rathi ·

Bhekrainagar Yoga Samajik Sanstha Diwali Pahat 2026, artists and organisers on stage Actual image
दिवाळी पहाट कार्यक्रमात कलाकार, मान्यवर आणि संस्थेचे पदाधिकारी

दिवाळीच्या पहिल्या दिवशी, वसुबारसेला (गुरुवार, 5 नोव्हेंबर 2026), भेकराईनगर योग सामाजिक संस्थेचा दिवाळी पहाट कार्यक्रम उत्साहात पार पडला. काळेपडळ, तुकाई दर्शन, पापडे वस्ती आणि भेकराईनगर परिसरातून आलेल्या रसिकांनी योग केंद्र पूर्ण भरले होते.

तीन कलाकारांची सुरेल मैफल

सकाळी 6 ते 9 या वेळेत भक्तिगीते, भावगीते, अभंग, लावणी आणि जुनी हिंदी मराठी गाणी सादर झाली. सांगलीहून आलेल्या निवेदिका आणि गायिका अर्चना कदम, तसेच योगसाधक उमेश माळी आणि शाहूराज माने यांनी एकापेक्षा एक गाणी सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. याच वेळी जवळच्या मंदिरांतून काकड आरतीचे स्वर ऐकू येत होते.

Read also: दुर्गम प्रतिष्ठानची राजगड परिसरातील ७५ कुटुंबांना दिवाळी भेट: महिनाभराचा किराणा, कपडे, सौर कंदील आणि शालेय साहित्य

रांगोळी, आकाश कंदील, विद्युत रोषणाई, अल्पोपहार आणि आलं घातलेला गरम आयुर्वेदिक चहा यांनी पहाटेचे वातावरण आणखी खुलले.

सन्मान आणि योगाचा संदेश

पुरस्कारप्राप्त शिक्षक आणि होळकरवाडी विद्यालयाचे मुख्याध्यापक गवारे सर यांनी सूत्रसंचालन केले. संस्थेचे सचिव सखाराम मांढरे सर यांनी स्वागत आणि आभार मानले. परिसरातील मान्यवर आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा शाल, श्रीफळ आणि गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. नियमित योग करून आरोग्य जपावे, या संदेशाने कार्यक्रमाचा समारोप झाला.

संस्थेचे अध्यक्ष संजय ढोक सर आणि सर्व योग कार्यकर्त्यांनी कार्यक्रमासाठी मेहनत घेतली.

Questions and answers

भेकराईनगर योग सामाजिक संस्थेची दिवाळी पहाट 2026 कधी झाली?

वसुबारसेच्या दिवशी, गुरुवार 5 नोव्हेंबर 2026 रोजी सकाळी 6 ते 9 या वेळेत, संस्थेच्या भेकराईनगर येथील योग केंद्रात.

भेकराईनगर दिवाळी पहाट 2026 मध्ये कोणत्या कलाकारांनी गाणी सादर केली?

सांगलीच्या निवेदिका आणि गायिका अर्चना कदम, योगसाधक उमेश माळी आणि शाहूराज माने यांनी भक्तिगीते, भावगीते, अभंग, लावणी आणि जुनी हिंदी मराठी गाणी सादर केली.

In English

Bhekrainagar Yoga Samajik Sanstha held its Diwali Pahat music programme on Vasubaras, Thursday 5 November 2026, from 6 to 9 am at its yoga centre in Bhekrainagar, Pune. Singer and anchor Archana Kadam from Sangli, with Umesh Mali and Shahuraj Mane, presented devotional songs, bhavgeet, abhang, lavani and old Hindi and Marathi songs to a full house from Kalepadal, Tukai Darshan, Papade Vasti and Bhekrainagar. Headmaster Gaware sir of Holkarwadi Vidyalaya anchored the event, secretary Sakharam Mandhare thanked the guests, and president Sanjay Dhok led the organising team. The programme ended with a message to practise yoga regularly.

When was the Bhekrainagar Yoga Samajik Sanstha Diwali Pahat 2026?

On Vasubaras, Thursday 5 November 2026, from 6 to 9 am at the yoga centre in Bhekrainagar, Pune.

Who sang at the Bhekrainagar Diwali Pahat 2026?

Archana Kadam from Sangli, Umesh Mali and Shahuraj Mane.

Follow PuneDiary on Facebook Daily Pune news, events and updates in your feed. Join 13,000+ Punekars.
Filed under: Social

Share this story

More Pune news

Something wrong or missing on this page? Suggest a correction
Our team checks every suggestion before the page is changed.