- Call 020 26130000 to Place your Ad here -

सहायक पोलीस आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांना केंद्रीय गृहमंत्री पदक जाहीर

महाराष्ट्र राज्यातील 10 पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश

- Call 020 26130000 to Place your Ad here -

पुणे(प्रतिनिधी) : गुन्ह्याचा उत्कृष्ट तपास केल्याप्रकरणी ‘केंद्रीय गृहमंत्री पदक 2020’ देशातील 121 अधिकाऱ्यांना जाहीर झाले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रातील 10 अधिकाऱ्यांचा समावेश आहे. पुणे शहर पोलीस दलात कार्यरत असलेले सहायक पोलीस आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांनाही या पदकाने गौरविण्यात येणार आहे.

पुणे शहर पोलीस दलात गुन्हे शाखेत सहायक पोलीस आयुक्त म्हणून डॉ. शिवाजी पवार कार्यरत आहेत. पुण्यातील विश्रामबाग पोलीस ठाण्यात एल्गार परिषद प्रकरणी दाखल गुन्ह्याचा त्यांनी सखोल तपास केला. मुंबई, नागपूर सह दिल्ली, हैद्राबाद, गोवा आदी देशभरात छापे टाकून पुरावे गोळा केले तसेच नक्षलवादी चळवळीशी संबंध असलेल्या संशयित आरोपीना अटक केली आहे.

दरम्यान, यावरून राजकीय आरोप प्रत्यारोप झाले. राजकीय वातावरण तापलेले असतानाही एसीपी पवार यांनी अत्यंत सचोटीने या गुन्ह्याचा तपास करीत आरोपीविरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. एक हुशार आणि तडफदार अधिकारी म्हणून पवार यांची पोलिस दलात ओळख आहे.

गुन्ह्याचा गुणात्मक आणि उत्कृष्ट तपास करणाऱ्या सीबीआय तसेच देशातील विविध राज्यातील पोलीस दलातील अधिकाऱयांना प्रोत्साहन देण्यासाठी 2018 पासून केंद्रीय गृहमंत्री पदक देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यंदा देशातील 121 अधिकाऱ्यांची या पदकासाठी निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये केंद्रीय तपास यंत्रणा (सीबीआय) 15 , महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश प्रत्येकी 10 , उत्तरप्रदेश 8 , केरळ आणि पश्‍चिम बंगाल प्रत्येकी 7 आणि ईतर राज्यातील पोलीस अधिकारी यांच्यासह 21 महिला अधिकारीचाही समावेश आहे.

महाराष्ट्रातील पदक जाहीर झालेल्या अधिकाऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे :- डॉ. शिवाजी पंडितराव पवार (एसीपी), राजेंद्र सिद्राम बोकाडे ( पोलीस निरीक्षक), उत्तम दत्तात्रय सोनावणे ( पोलिस निरीक्षक), नरेंद्र कृष्णराव हिवरे (वरीष्ठ निरीक्षक), ज्योती लक्ष्मण क्षीरसागर ( पोलीस अधीक्षक), अनिल तुकाराम घेर्डीकर (एसडीपीओ), नारायण देवदास शिरगावकर (पोलीस उपअधीक्षक), समीर नजीर शेख ( एसीपी), किसन भगवान गवळी ( एसीपी), कोंडीराम राघू पोपेरे ( पोलीस निरीक्षक ).

Source: “प्रभात” via Dailyhunt

Leave A Reply

Your email address will not be published.