पुनीत बालन स्टुडिओजच्या शॉर्टफिल्म्सचा आंतरराष्ट्रीय पातळीवर गौरव

- ‘आशेची रोषणाई’ ला ‘इस्तंबूल फिल्म फेस्टिव्हल’ मध्ये ‘ज्यूरी स्पेशल अवॉर्ड’ - ‘पुनरागमनाय च’, ‘आशेची रोषणाई’ ची अमेरिका, इंग्लंड मधील फेस्टिव्हल्ससाठी निवड

युवा उद्योजक आणि निर्माते पुनीत बालन यांच्या पुनीत बालन स्टुडिओजची निर्मिती असलेल्या  ‘आशेची रोषणाई’ या सामाजिक संदेश देणार्‍या शॉर्टफिल्मचा गौरव नुकत्याच संपन्न झालेल्या बेस्ट इस्तंबूल फिल्म फेस्टिव्हल’ मध्ये करण्यात आला. ‘आशेची रोषणाई’ या शॉर्टफिल्मला ‘बेस्ट शॉर्टफिल्म ज्यूरी स्पेशल अवॉर्ड’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

‘आशेची रोषणाई’ या शॉर्टफिल्म मध्ये निर्माते पुनीत बालन यांनी ‘आज कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी लॉकडाउनमुळे अनेक घटकांना आर्थिक फटका बसला आहे, त्या घटकांच्या आयुष्यात आनंद पसरवूया’ ही सामाजिक संदेश देणारी संकल्पना मांडली आहे. सिनेमॅटोग्राफी आणि दिग्दर्शन महेश लिमये यांचे असून संगीतकार अजय – अतुल यांनी पार्श्वसंगीताचा साज चढवला आहे तर अभिनेता रितेश आणि जेनेलिया देशमुख  यांनी ‘आशेची रोषणाई’ला चार चाँद लावले आहेत.

पुनीत बालन

‘आशेची रोषणाई’ या शॉर्टफिल्मला यापूर्वी ‘7 व्या  गोवा शॉर्टफिल्म फेस्टिव्हल’ मध्ये ‘बेस्ट डॉकयूमेंट्री’ अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे. इंग्लंडच्या ‘बेस्ट फिल्म अवॉर्ड’ फेस्टिव्हलमध्ये ‘बेस्ट डायरेक्टर अवॉर्ड – सेमी फायनालिस्ट’ आणि अमेरिकेच्या लॉस एंजलीस येथील ‘इंडिपेंडंट शॉर्ट्स अवॉर्ड’ साठी निवड झाली आहे.

दरम्यान, पुनीत बालन स्टुडिओजची निर्मिती असलेल्या ‘पुनरागमनाय च’ या शॉर्टफिल्मची सुद्धा इंग्लंडच्या ‘बेस्ट फिल्म अवॉर्ड’ फेस्टिव्हलमध्ये ‘बेस्ट डायरेक्टर अवॉर्ड – सेमी फायनालिस्ट’ आणि अमेरिकेच्या लॉस एंजलीस येथील ‘इंडिपेंडंट शॉर्ट्स अवॉर्ड’ साठी निवड झाली आहे. यापूर्वी ‘पुनरागमनाय च’ या शॉर्टफिल्मसाठी ‘7 व्या  गोवा शॉर्टफिल्म फेस्टिव्हल’ मध्ये महेश लिमये यांना ‘सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.