- Call 020 26130000 to Place your Ad here -

पुणे ग्रामीण पोलीसांकडून ड्रोनद्वारे ‘लॉकडाउन

पुणे ग्रामीण दि ३० :-कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात सध्या संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संपूर्ण देश ‘लॉकडाऊन’ करण्यात आलेला आहे. तसेच शहरापासून ते राज्यापर्यंच्या सर्व सीमा अत्यावश्यक सेवा वगळून वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेल्या आहेत. सर्व ठिकाणी पुणे ग्रामीण पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आलेले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पोलिसांकडून जनतेला घरातून बाहेर न पडणे

- Call 020 26130000 to Place your Ad here -

Locked down

Locked down by drone

बाबत वारंवार आवाहन करण्यात येत आहे. परंतु काही लोक सदरच्या आवाहनाला प्रतिसाद देत नाहीत. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अडथळे येत आहेत. पोलिसांनी दिलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष करून काही लोक रस्त्यावरती फिरताना दिसत आहेत. लॉकडाऊन प्रभावीपणे राबवण्यासाठी अशा लोकांवरती नजर ठेवण्याकरता पुणे ग्रामीण पोलीस दलाकडून नांदेड सिटी, बारामती शहर, वाघोली, लोणीकाळभोर, लोणावळा शहर अशा शहरी वस्ती असलेल्या ठिकाणी ड्रोनच्या साहाय्याने फिरणार्‍या लोकांवर नजर ठेवून तसेच ज्या ठिकाणी लोकांनी गर्दी केली आहे अशा ठिकाणी पोलिसांची पेट्रोलिंग वाढवून फिरणाऱ्या लोकांवरती कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे लोकांना आवाहन करण्यात येत आहे की, त्यांनी घरातून बाहेर पडू नये व पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे.

पोलीस अधीक्षक,पुणे ग्रामीण

Leave A Reply

Your email address will not be published.